✍️देसाईगंज:पोरकेपणाचे संकट कोसळलेला आठ वर्षांचा करण व पाच वर्षांची दीपाली ही भावंडे आजी-आजोबांकडे कुकडी या गावात राहतात. मात्र, आजी-आजोबांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने म्हातारपणात दोन नातवंडांचे पालनपोषण करणे कठीण ठरत आहे. या दोन भावंडांबाबत माहिती मिळताच, सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके यांनी तातडीने कुकडी गावात पोहोचून पोरके झालेल्या भावंडांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासली.
‘लोकमत’मधील बातमी वाचून मन सुन्न झाले. अशी वेळ कोणावरही येऊ नये, असा विचार मनात आला. त्यामुळे त्या मुलांना आधार मिळावा या उद्देशाने सरकारी योजनांचा लाभ मिळणार आपण ही छोटीशी आर्थिक मदत त्यांना केल्याचे समाधान मला मिळेल, असे छगन शेडमाके म्हणाले. यावेळी कुकडीच्या पोलिस पाटील सविता किरगे, चंद्रभान कुंबरे, सुमन पदा अश्विनी किरंगे, किशोर किरंगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
