कुरखेडा/कूंभीटोला:
कूंभीटोला येथील शेतकरी देवराव मानकु नैताम ह्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेतकरी आत्महत्येची माहिती कानावर पडताच विधान परिषदेचे आमदार, रामदासजी आंभटकर व आरमोरी विधान सभेचे आमदार, कृष्णा गजबे यानी गूरूवार रोजी दुपारी एक वाजता भेट घेत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य पत्नी सुमन देवराम नैताम, मुलगी वृंदा नैताम, मुलगा वीलास देवराम नैताम, मुलगी करिष्मा दिलीप गोटा यांची विचारपूस केले व त्यांच्या कुटुबियाना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना रोख आर्थीक मदत प्रदान केली.
यावेळी आमदार रामदासजी आंबटकर, आमदार कृष्णा गजबे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजप शहर अध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, भाजपा तालुका महामंत्री ऍड. उमेश वालदे, नगरसेवक रामभाऊ वैध, नगरसेवक सागर निरंकारी, भाजपा तालुका महिला अध्यक्ष जयश्री मडावी, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो तालुका सचिव पुष्पराज रहांगडाले उपसरपंच मधुकर गावडे तसेच गावकरी हजर होते.
