एका उपोषणकरत्याची प्रकृति खालावाली,उपचार झाल्या लगेच दुस-या दिवशी उपोषण स्थळी पुन्हा उपोषणा करिता दाखल
अन्याया विरुद्ध शेवठ पर्यंत लडण्याची व कायदेशीर दोषींवर कार्यवाही न झाल्यास तोपर्यंत माघार न घेण्याचा उपोषण करत्यांचा निर्धार
? ताहिर शेख???
कुरखेडा:- १८ मार्च२०२३ कुरखेडा तालुक्यातील व कुंभीटोला येथील विटभट्टी व अवैध रेती उत्खनन विरोधात मागिल(१३/०३/२०२३) ६ दिवसापासुन l गावकर्यांच्या समर्थनाशी कुंभीटोला येथील चेतन गंगाधर गहाने, आणि राजू सदरु मडावी हे दोगेही उपोषण करित आहेत l १६ मार्च रात्री ९ वाजता राजू सदरु मडावी याची प्रकृति अचानक खालावल्याने l उपोषण स्थळी उपोषण करत्यांच्या सुरक्षेत असलेले पोलिसांनी त्याला एंबुलेंस च्या सहाय्याने उप जिल्हा रुग्णालय कुरखेडा इथे दाखल केले l एक दिवस उपचार होताच रुग्णालयातून दुसऱ्या दिवशी सुट्टी घेताच १७ मार्च ला अंदाजे ९ वाजता पुन्हा उपोषण स्थळी राजू मडावी ऊपोषणात सहभागी झाला l गावकर्यांना या अवैध वीटभट्टी व अवैध रेती उत्खनन चा त्रास बघता l दोषींवर जो पर्यंत योग्य कार्यवाही होत नाही तो पर्यंत उपोषण मागे न घेण्याचा सुद्धा या वेळी बोलतांना दोन्ही उपोषणकरत्यानी आपले मत व्यक्त केलेला आहे

