कुरखेडा:शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज आम आदमी पार्टीचा भव्य चक्का जाम आंदोलन
शेतीला उद्योगाचा दर्जा देवून २४ वीज मागणीसाठी १५ मार्च २०२३ ला आम आदमी पक्षाचा भव्य चक्का जाम आंदोलन गुरनोली फाटा,(पॉवर स्टेशन जवळ), गेवर्धा तालुका कुरखेडा येथे यशस्वीरित्या शांतापूर्ण स्थितीत झाला.
आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाने शेतीला उद्योगाचा दर्जा बहाल करून. उद्योग प्रमाणे शेतीलाही २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी कुरखेडा चे वतीने गेवर्धा येथे भव्य चक्काजाम आंदोलन शेकडो शेतकऱ्यांच्या व आप कार्यकर्ते सहभागी होवून कुरखेडा वडसा रस्त्यावर बसून जवळपास २ तास चक्काजाम आंदोलन केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील नायब तहसीलदार अनमदवार यांनी जबाबदारी पार पडली. पोलिस विभागाने आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी स्वतः आंदोलन स्थळी तळ ठोकून व्यवस्था बघितली.
ओ*गडचिरोली - वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!*
गडचिरोली, दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...
गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३...