कुरखेडा:-०३/१०/२०२३ शहरात निरंकारी चैरिटेबल ट्रस्ट शाखा कूरखेडा चा वतीने आज मंगळवार रोजी येथील निरंकारी भवनात आयोजित रक्तदान शिबीरात परीसरातील १०६ रक्तदात्यानी रक्तदान करीत महाराज हरदेव सिंहजी यांचा शिकवणीला सार्थक करीत त्याना आदरांजली अर्पण केली
निरंकारी मिशन चे प्रमूख संत हरदेव सिंह जी महाराज यानी मानवाचा मनातील रक्तपात,घृणा व प्रतिशोधाची भावणा नष्ट होण्याकरीता ‘”रक्त गटारात वाहण्यापेक्षा नाडीत वाहला पाहीज'” हा संदेश आपल्या अनूयायाना दिला होता या संदेशाचे पालन करण्याकरीता सन १९८६ पासून निरंकारी मिशन द्वारे ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे कूरखेडा शाखे द्वारे सूद्धा सन २०१२ पासून नियमित रक्तदान शिबीराचे
आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी येथे मोठ्या संख्येत निरंकारी अनूयायासह सामान्य नागरीकाकडून सहभाग नोंदविण्यात येत रक्तदानाचे पवित्र कार्य करण्यात येते आज येथे आयोजित रक्तदान शिबीरात १०६ रक्तदात्यानी या पवित्र कार्यात सहभाग नोंदवित आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली शिबीराचे उदघाटन निरंकारी मिशनचे झोनल इंचार्ज कीशनजी नागदेवे यांचा हस्ते करण्यात आले त्यानी स्वत
रक्तदान करीत मिशनचा अनूयायाना प्रेरीत केले याप्रसंगी गडचिरोली क्षेत्रीय संचालक हरीश निरंकारी मंडळाचे कूरखेडा शाखा मूखी माधवदास निरंकारी भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये ता कांग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट नगरपंचायत उपाध्यक्ष बबलूभाई हूसैनी भाजपा अनुसूचित जाति आघाडी जिल्हा अध्यक्ष अॅड उमेश वालदे माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे सामाजिक कार्यकर्ते डॉ सतीश गोगूलवार वैद्यकीय अधिक्षक डॉ अमीत ठमके, डॉ जगदीश बोरकर,प्रा कीशोर खोपे प्रा डॉ दशरथ आदे प्रा डॉ नरेन्द्र आरेकर, रक्त संकलन टेक्निशियन सतीश ताटकलवार आदि उपस्थित होते शिबीराचा यशस्वीतेकरीता निरंकारी मिशन सेवादल शाखा संचालक दिलीप निरंकारी, जगदीश वरलानी विवेक निरंकारी शिक्षक अजय पूस्तोडे लोमेश नाकतोडे बंटी देवढगले योगेश नंदनवार संदीप मेश्राम गजानन गायकवाड़ मूकेश निनावे कूमारनाथ प्रधान नितेश निरंकारी देवेन्द्र शूद्धलवार रामदास मरापे सागर निरंकारी रोहित खडाधार धृव पूजारी ओमप्रकाश पूस्तोडे तानेश ताराम व सर्व सेवादल यानी सेवा बजावली वैद्यकीय सहकार्य जिल्हा रक्तसंकलन चमू जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली व वैद्यकीय चमू उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा यानी केले