गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथील लायड्स मेटल एनर्जी लिमिटेडच्या लोहखनिजावर उत्पादित कारखान्याचे काम सुरू असून कोनसरी येथील स्थानिक कामगारांनी आज कामावर बहिष्कार टाकत लाक्षणिक विरोध केला आहे. स्थानिक नागरिकांनी या कंपनीने जमिनीच्या भूसंपादनाबाबत नागरिकांची दिशाभूल केली असून कंपनीने जमीन खरेदी करताना ज्या अटी व शर्थीचे पालन करण्याचे मान्य केले त्याला आता तिलांजली देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच कंपनी नव्याने भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमीन व्यवहाराबाबत दिशाभूल करीत आहे.स्थानिक मजूरांना अतीशय तुटपुंज्या वेतनात रोजगार देत आहे त्यामुळे भूमीपुत्रावर हा एक प्रकारचा अन्याय होत असल्याची स्थानिकांची भावना आहे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन कंपनी व सरकारने दिले असले तरी हळूहळू कंपनीने बाहेर राज्यातील कामगारांना येथे रोजगार देण्यास प्रारंभ केला असून त्यांच्या आणि स्थानिक कामगारांच्या वेतनात तफावत आहे इतकेच नाही तर स्थानिक कामगारांना मानसीक त्रास देत जणू काही आम्ही रोजगार देऊन तुमच्यावर उपकार केले असल्याचे भावनेने कंपनी प्रशासन स्थनिक कामगारांसोबत वागणूक देत असल्याचे स्थानिक कामगारांनी सांगीतले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
#सरकार व प्रशासन कोनसरी येथील प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार देणार असल्याचा गवगवा करीत असले तरी तीनशे ते साडेतीनशे इतकी अत्यल्प मजुरी देवून भांडवलदार कामगारांचे शोषण करीत असल्याची वास्तविक परिस्थिती आहे. याविरोधात आज कोनसरी येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद असून स्थानिक कामगारांनी आज कामावर बहिष्कार टाकला आहे. तसेच गावकरी या मुद्द्यावर एकत्रित येत कंपनीच्या कारभारविरोधात रोष व्यक्त. केला आहे
✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...
✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...