Friday, May 16, 2025
Homeगडचिरोलीआता खाजगी बस मध्ये सुद्धा महिलाना तिकिट दरात पनास टक्के सूट

आता खाजगी बस मध्ये सुद्धा महिलाना तिकिट दरात पनास टक्के सूट

✍️गडचिरोली : राज्य सरकारने नुकताच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनामध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती. याच धर्तीवर आता खासगी बसमध्ये सुध्दा महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनकडून घेण्यात आला आहे. आज गुडीपाडवापासून नवे तिकीट दर लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

का घेतला निर्णय

शासनाने जाहीर केलेल्या सवलतीमुळे खासगी बसपेक्षा एसटी महामंडळाच्या बसमधून महिला प्रवास करु लागल्या. यामुळे खासगी ट्रव्हल्सला प्रवाशी मिळत नव्हती. त्यासंदर्भात गडचिरोली -चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत गडचिरोली – चंद्रपूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल असा विश्वास चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स सदस्य असोसिशनचे अविनाश वरगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. एसटी महामंडळाने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नियम तयार केले आहे. परंतु खासगी ट्रव्हल्सकडे असे काही नियम नाहीत.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

फौजदार अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

✍️ :पोलिस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी करुन बजाविलेल्या सेवेसाठी २०२४ या वर्षाकरीता 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान महाराष्ट्र दिनी...

सामान्य माणसाचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही

गडचिरोली, (जिमाका) दि.01: 'सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,' अशी...

Recent News

Most Popular

Recent Comments