आदिवासींनी भाषा संस्कृतीची जोपासणा करणे काळाची गरज
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे यांचे प्रतिपादन
गडचिरोली-
अनादी काळापासून चालत आलेली आदिवासींची बोली भाषा व संस्कृती महान असुन समस्त आदिवासी निसर्गपुजक आहेत. आदिवासी हे देशातील मुळ रहिवासी असले तरी विकासाच्या मुख्य प्रवाहापासुन अलिप्त ठेवण्यासाठी कटकारस्थान रचल्या जात असल्याने अलिकडे थापाड्यांपासुन सचग राहणे अत्यावश्यक आहे.संवाद टिकवून ठेवण्यासाठी आपली भाषा संस्कृती जोपासने काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे यांनी केले.
कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा समितीच्या वतीने आयोजीत कोयापुनेम संमेलन व समाज प्रबोधन मेळाव्याच्या उद्घाटना प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती श्रीराम दुगा, सरपंचा रेखा कोकोडे, चरणदास पेंदाम,रामचंद्र काटेंगे,संजय कोकोडे,अनिल केरामी,शशिकांत मडावी, नंदकिशोर नैताम,कोकिळा पेंदाम,संदिप वरखडे,दादाजी सुकारे,मुनेश्वर बोरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नरोटे म्हणाले की जल,जंगल, जमिनसाठी बिरसा मुंडांनी क्रांती केली.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा पिढीने स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आदिवासींच्या चांगल्या रुढी, परंपरा,बोलिभाषा व संस्कृतीचे जतन करणे तेवढेच गरजेचे आहे.येणाऱ्या आव्हानांना पेलायचे असेल तर गुणात्मकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असल्याने दिशा ठरवून पाऊल टाकणे सर्वांच्या हिताचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मोरु मसराम,प्रास्ताविक रेवन कोकोडे यांनी तर आभार प्रदर्शन दिपक कोकोडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयदेव चिकराम,उत्तम कोकोडे,श्याम कुळमेथे,दिपेंद्र कोकोडे, आसाराम उसेंडी व अंगारा येथील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.तिन दिवस चालणाऱ्या या संमेलनात पारंपरिक आदिवासी रेला नृत्य,रांगोळी स्पर्धा,गोंडी नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
