गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे यांचे प्रतिपादन
✍️देसाईगंज- शैक्षणिक गुणवत्तेच्या भरोशावरच मोठी पदे पादाक्रांत करणे शक्य आहे. शैक्षणिक पात्रता जरी असली तरी मोठ्या पदावर आदिवासींची संख्या पाहु जाता समाजाच्या विद्यार्थ्यांनी केवळ पदव्या मिळवण्यातच धन्यता मानली असल्याने यथाचे यथोचित शिखर गाठता आले नाही.त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी केवळ पदव्या मिळवण्यातच धन्यता न मानता स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे यांनी केले. ते कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड अनुसूचित आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने मी आयएएस अधिकारी होणार या उप्रकमावर आधारीत आयोजीत स्पर्धा परिक्षा व मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी सहकार विभागाचे सेवानिवृत्त जॉइंट डायरेक्टर कृष्णा हरिदास, अमरावती येथील मिशन आयएएसचे डाॅ.नरेश्चंद्र काठोळे,मुख्याध्यापक सपाटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देशमुख, अधिक्षिका गहाणे,शिक्षक बिसेन,राऊत, कुंभारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना नरोटे म्हणाले की कुठलेही यश संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.पोलिस अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी या सारखी महत्त्वाची पदे मिळवायची तर स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नसल्याने व याशिवाय आदिवासींना आपल्या न्याय हक्काची लढाई लढणे शक्य नसल्याने त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द बाळगलीच पाहिजे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजीत कार्यक्रमात सहकार विभागाचे सेवानिवृत्त जाॅईंट डायरेक्टर कृष्णा हरिदास यांनी स्पर्धा परिक्षा व त्याची तयारी याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.तर मिशन आयएएसचे डाॅ.नरेश्चंद्र काठोळे यांनी आयएएस अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परिक्षा व त्या अनुषंगाने करावयाची तयारी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक बिसेन यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक देशमुख यांनी तर आभार अधिक्षिका गहाणे यांनी मानले.कार्यक्रमाला परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...
✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...