जुनी वडसा तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची गरज
देसाईगंज सघर्षं न्यूज नेटवर्क |
जुनी वडसा येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला तलाव असून या तलावाचे पुनरजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
जुनी वडसा तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची गरज
ठळक मुद्दे
आठवणींचा ठेवा : तलावात पाण्याचा अत्यल्प जलसाठा, खोलीकरण करणे गरजेचे
जुनी वडसा येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला तलाव असून या तलावाचे पुनरजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.गाव अस्तीत्वात आला तेव्हापासून जुनी वडसा गावाला तलाव खोल असल्याने येथे वर्षभर नेहमी पाणी साचून असते. ३० ते ४० वर्षापुर्वी या तलावाचे पाणी जनावरांना दिले जात होते. यासाठी नागरिक कावड, घागर, बादलीने पाणी नेत होते. किंवा जनावरे तलावावर पाणी पिण्यासाठी येत होते सध्या परिस्थिती बदलली आहे. पाण्याची सोय घरोघरी झाली. विहीरी बोरवेल्स झाल्याने तलावाच्या पाण्याचा वापर होत नाही. तलावातील पाणी नागरिक शेतीसाठी नेत होते पण ते देखिल होत नसल्याने बाराही महिने तलावात पाणी साचून राहते.जुनी वडसा येथील तलाव गावालगत असल्याने त्याचे खोलीकरण होणे गरजेचे आहे.तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्याचे खोलीकरण होणे आवश्यक आहे. तसेच तलावाच्या सभोवताल झाडे लावून नगर परिषद देसाईगंज ने सौंदर्यीकरण करने गरजेचे आहे व्यापक स्वरूप देऊन तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात वाढ होईल.यासाठी नगर परिषद देसाईगंज ने पुढाकार घेणे आवश्यक आहे. जुनी वडसा हे गाव देसाईगंज ची पुराणी वस्ती आहे देसाईगंज वडसा ( जुनी वडसा)तीन जिल्हातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पर्यटनास मोठी चालना दिल्यास तलावात बोटींग सुरू करता येईल.(जुनी वडसा) देसाईगंज ही एक मोठी बाजार पेठ आहे तीन जिल्ह्यातील नागरिक खरेदी करिता वडसा तालुक्यात येत असतात चंद्रपुर,भंडारा गोंदिया येथील नागरिक खरेदीसाठी येत असतात. तलावात नैसर्गीक सौंदर्यात वाढ करून सोयीसुविधा निर्माण केल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते.तलावाच्या रोड वर शेकडो वर्षे पुराणा देऊळ आहे या देऊळत गावातील लोकांची आस्था आहे या देऊळकडे ही नगर परिषद ने लक्ष देऊन बांधकाम करणे आवश्यक आहे ,असे गावातील नागरिकांचे बोलणे आहे तेव्हा तलावाचे सौंदर्यीकरण व देऊडाचे बांधकाम केल्यास पर्यटनास चालना मिरेल तलावात नौकाविहार सुरू केल्यास हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास वेळ लागणार नाही.तलावाची कायापालट करण्याची मागणीगावाच्या नागरिकांनी केली आहे गावाचा मधोमध हे तलाव असून येथे लोकांची वर्दळ दिवसभर असते. तेव्हा या तलावास सौंदर्यीकरण करून गावाचा विकास करणे गरजेचे आहे. शासन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी देत असते.जुनी वडसा येथील तलावाच्या सौंदर्याकरणासाठी पुढाकार घेऊन तलावाचा कायापालट करण्याची मागणी आम आदमी पार्टी चे अतुल ठाकरे प्रमोद दहिवले तसेच येथील निसर्गप्रेमी लोकांनी केली आहे.