गडचिरोली:##आम आदमी पार्टी देसाईगंजच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री आप पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आमदार कृष्णा गजभिये यांच्या कार्यालय समोर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले दिनांक 22-3-24 रोज शुक्रवारला आरमोरी विधान सभा शेत्राचे
आमदार कृष्णा गजभिये यांच्या कार्यालया समोर आम आदमी पार्टीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रकाश जीवानी, विदर्भ मिडिया प्रमुख नसिर हाशमी,ताहीर शेख कुरखेडा,देसाईगंज तालुका अध्यक्ष भरत दयलानि,शहर अध्यक्ष आशिश घुटके,सलाहगार दिपक नागदेवे,तबरेज खान,प्रमोद दहिवले,नाजूक लुट्टे,सुशील केशवाणी,वामन पगारे,रेवन झिलपे,देवा जांबुरकर,शेखर बारापात्रे रामदास गोन्दाने,आरिफ शेख यांच्या नेतृत्वात केजरीवाल जी यांना ईडी ने बेकायदेशीरपणे अटक केल्याचे निषेधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ईडी चे व सरकारचे विरोधात घोषणा देत गडचिरोली जिल्हातील आपचे कार्यकर्त्यांनी बस स्टप बी जे पी कार्यालयात केजरिवाल को रिहा करो चे नारे लावून आक्रोश मोर्चा काढले आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे चे पदाधिकारी आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.