गडचिरोली:गडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हापासून गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा 31 वा जिल्हा म्हणून ओळखल्या जात आहे. जिल्ह्याच्या निर्मितीला आता ४१ वर्ष होत आली तरी आजही जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा म्हणूनच आहे. निसर्गाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे. आपल्याकडे गेली अनेक वर्ष विकासाबाबत चर्चा आहे. पण विकासाची नेमकी व्याख्या काय हे अजूनही कळलेले नाही. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सुटू देत की नको सुटू देत शहरात उंचच उंच इमारती, एक दोन मॉल, शोरूम्स, मोठे मोठे हॉटेल्स व ते तयार करण्यासाठी केलेली निसर्गाची बेसुमार कत्तल यासारख्या अनेक गोष्टी झाल्या की त्याने डोळे दिपून आपणही विकास होतोय अशा नशेत गुंग होतो. पण खरंच याला विकास म्हणावे काय ? मुळात शासनालाही येथील जिल्हावासीयांना हवा असलेला विकास हा कळलाच नाही. विकास म्हणजे एखाद्या परिसराचा, क्षेत्राचा अथवा जागेचा आढावा घेऊन तेथील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेऊन यावर उपाय योजना करणे म्हणजे विकास ही साधी सोपी विकासाची व्याख्या आहे. परंतु तुम्ही यावर सहमत असाल असे नाहीच. तर स्थानिक लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. शासनाने यावर उपाययोजना म्हणून अनेक योजनांमार्फत युवक वर्गाला वेगवेगळी कौशल्ये शिकवून बाहेर जिल्ह्यात तुटपुंज्या मानधनावर काम मिळवून दिली. यावर उद्भवणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रोजगारासाठी जर दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागत असेल तर शासनाने जिल्ह्याचा काय विकास केला ? निसर्गाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे. रोजगारागडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हापासून गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा 31 वा जिल्हा म्हणून ओळखल्या जात आहे. जिल्ह्याच्या निर्मितीला आता ४१ वर्ष होत आली तरी आजही जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा म्हणूनच आहे. निसर्गाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे. आपल्याकडे गेली अनेक वर्ष विकासाबाबत चर्चा आहे. पण विकासाची नेमकी व्याख्या काय हे अजूनही कळलेले नाही. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सुटू देत की नको सुटू देत शहरात उंचच उंच इमारती, एक दोन मॉल, शोरूम्स, मोठे मोठे हॉटेल्स व ते तयार करण्यासाठी केलेली निसर्गाची बेसुमार कत्तल यासारख्या अनेक गोष्टी झाल्या की त्याने डोळे दिपून आपणही विकास होतोय अशा नशेत गुंग होतो. पण खरंच याला विकास म्हणावे काय ? मुळात शासनालाही येथील जिल्हावासीयांना हवा असलेला विकास हा कळलाच नाही. विकास म्हणजे एखाद्या परिसराचा, क्षेत्राचा अथवा जागेचा आढावा घेऊन तेथील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेऊन यावर उपाय योजना करणे म्हणजे विकास ही साधी सोपी विकासाची व्याख्या आहे. परंतु तुम्ही यावर सहमत असाल असे नाहीच. तर स्थानिक लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. शासनाने यावर उपाययोजना म्हणून अनेक योजनांमार्फत युवक वर्गाला वेगवेगळी कौशल्ये शिकवून बाहेर जिल्ह्यात तुटपुंज्या मानधनावर काम मिळवून दिली. यावर उद्भवणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रोजगारासाठी जर दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागत असेल तर शासनाने जिल्ह्याचा काय विकास केला ? निसर्गाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे. रोजगारासाठी आपल्याला बाहेर जायची काहीच गरज नाही. जर, शासन, प्रशासनाने यावर लक्ष दिले तर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वनसंपत्ती आहे. त्या वनसंपत्ती मधूनच आयुर्वेदिक औषध निर्मिती, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन निर्मिती आदी उद्योग निर्माण होऊ शकतात. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बांबू काष्ठशिल्प कलेत निपुण असणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी बाजारपेठ याठिकाणी निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यात टिपागड, बिनागुंडा (राजीरप्पा धबधबा), मुतनूर, मार्कंडा,अरततोंडी इत्यादी स्थळांचे सौंदर्यीकरण करून रोजगार निर्मिती होऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे जिल्ह्यात असणाऱ्या साधन संपत्तीनेच रोजगार सहज निर्माण होऊ शकते.साठी आपल्याला बाहेर जायची काहीच गरज नाही. जर, शासन, प्रशासनाने यावर लक्ष दिले तर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वनसंपत्ती आहे. त्या वनसंपत्ती मधूनच आयुर्वेदिक औषध निर्मिती, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन निर्मिती आदी उद्योग निर्माण होऊ शकतात. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बांबू काष्ठशिल्प कलेत निपुण असणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी बाजारपेठ याठिकाणी निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यात टिपागड, बिनागुंडा (राजीरप्पा धबधबा), मुतनूर, मार्कंडा,अरततोंडी इत्यादी स्थळांचे सौंदर्यीकरण करून रोजगार निर्मिती होऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे जिल्ह्यात असणाऱ्या साधन संपत्तीनेच रोजगार सहज निर्माण होऊ शकते.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...