गडचिरोली:जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, अत्याधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील उपपोस्टे पेंढरी, चातगाव, गोडलवाही, गड्डा (फु.), पोस्टे कारवाफा व पोस्टे धानोरा हद्दीतील एकुण ५० शेतकऱ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिड़की’ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने पाचव्या कृषीदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले.