Monday, March 24, 2025
Homeगडचिरोलीकोरची - कुरखेडा मार्गावर मोहगाव नजीक भीषण अपघात*

कोरची – कुरखेडा मार्गावर मोहगाव नजीक भीषण अपघात*

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कोरची – कुरखेडा मार्गावर मोहगाव नजीक भीषण अपघात

कोरची:मुख्यालयापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर मोहगाव नजीक गुरुवारी दुपारी सुमारे दोनच्या दरम्यान कोरची येथून कुरखेडा कडे प्रवासी घेऊन जाणारी महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक MH 04 BQ 1924 भरधाव वेगाने जात होती व समोरून येणारी दुचाकी क्रमांक CG 08 F 3217 ला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वार रस्त्याच्या एका कडेला व दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून मृतकाचे नाव छबिलाल चोरी रा. मोहगाव आहे. प्रवासी घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये दोन चिमुकल्या समवेत दहा प्रवाशी होते. ज्यामध्ये अंजना मडावी पड्यालजोब (26), उसन लाडे कराडी (52), नामदेव तुलावी लवारी (28) पूजा तुलावी/लवारी (25), युग तुलावी लवारी (5 महिने), जयश्री फुलकुवर पांडूटोला (24), सोनल फुलकुवर पांडूटोला (34), रश्मी मडावी बेळगाव (35), राशी मडावी बेळगाव (9) असे अपघातग्रस्तांचे नाव असून एका महिलेचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून मृतक महिलेची ओळख पटू शकली नव्हती.

अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिकेला दीपक नरडंगे यांनी संपर्क केला व घटनास्थळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे, वसीम शेख, सुरज हेमके, आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, पद्माकर मानकर, चतुर सिंद्राम आदींनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात दाखल केले. रुग्णांची तपासणी डॉ. अभय थुल व डॉ. राहुल राऊत यांनी केली. सदर घटनेची चौकशी पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक फुलकुवर व चमू करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतरचालक हा गाडी सोडून पसार झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments