Thursday, February 6, 2025
Homeगडचिरोलीगडचिरोलीतून डॉ.मिलिंद नरोटे भाजपचे उमेदवार

गडचिरोलीतून डॉ.मिलिंद नरोटे भाजपचे उमेदवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण २२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
आधी 99 जणांची यादी जाहीर केली आहे. आता एकूण 121 उमेदवार जाहीर झाले आहे. या दुसऱ्या यादीत गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली आहे. तर नाशिकमधून
देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राची भाजपची उमेदवारी डॉ. मिलिंद नरोटे यांना जाहीर झाली. सलग दोन टर्म आमदार राहिलेले विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांना तिसऱ्यांदा संधी नाकारून भाजपने नव्या चेहऱ्याला संधी दिली.
भाजपची दुसरी यादी

धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख मदनलाल संचेती
अकोट – प्रकाश भारसाकले
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम (अजा) – श्याम रामचरणजी खोडे
मेळघाट – केवलराव काळे
गडचिरोली – मिलिंद नरोटे
राजुरा – देवराव भोंगले
ब्रहमपुरी – कृष्णलाल बाजीराव सहारे
वरोरा – करण देवतले
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार उत्तमचंद आयलानी
पेन – रवींद्र दगडू पाटील
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे (छावणी)- सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासणे
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधान आवताडे
शिराळ – सत्यजित शिवाजीराव देशमुख
जत – गोपीचंद पडळकर

 

विशेष म्हणजे, पुण्यात भाजपकडून सर्व आमदार पुन्हा आहे तसेच रिपीट करण्यात आले आहे. कँन्टोमेंटमधून पुन्हा सुनील कांबळे यांनाच उमेदवारी दिली आहे. तर खडकवासला मधूनही भीमराव तापकीर यांनाच पुन्हा संधी दिली आहे. कसब्यातूनही पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या हेमंत रासने यांनाच पुन्हा तिकीट दिलं आहे. पुण्यातून भाजपने यावेळी एकही नवा चेहरा दिला नाही.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments