गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे, त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की पत्रकार चंद्राकर यांची खाण माफियांनी निघृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. ही गंभीर बाब आहे. गडचिरोली जिल्हा सुद्धा छत्तीसगडच्या सीमेवर असून जिल्ह्यात सुध्दा अनेक खाण माफिया असून ते मुरुम, रेती माती, गिट्टी या सह गौनखनिज आणि गौन वनोपजांची अवैध वाहतूक करीत असतात. त्यांची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या अशा कुकृत्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकार हे निर्भिडपणे आपले काम चोख बजावू शकत नाहीत.सरकारने पत्रकार संरक्षण कायदा बनविला आहे. मात्र या कायद्याची प्रशासनाकडून प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी उचित पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पत्रकार चंद्राकर यांच्या हत्येनंतर सरकार आणि प्रशासनाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली असून चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि देशभरातील पत्रकारांना उचित संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील पत्रकार एकवटले होते. पत्रकारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा मुक मोर्चा पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बैठक कक्षात सर्वांना पाचारण करून त्यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती , पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदिंसाठी तयार केलेल्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांचे कडून नेमका विषय समजून घेतला व सदर विषयावर गडचिरोली जिल्हा प्रशासन सकारात्मक भूमिका घेतानाच पत्रकारांच्या तीव्र भावना राज्य सरकार पर्यंत पोहोचविल असे आश्वासन दिले. यानंतर पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुध्दा निवेदन देऊन आपल्या मागण्या पोलीस प्रशासनापुढे ठेवल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी निवेदन स्वीकारले.
मोर्चाचे संयोजक पत्रकार मुनीश्वर बोरकर, गडचिरोली प्रेस क्लबचे सुरेश पद्मशाली, ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर, गामाचे संयोजक उदय धकाते, व्हाइस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय तिपाले, जयंत निमगडे, मुकुंद जोशी, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे जगदिश कन्नाके, मारोती भैसारे विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कहूरके, कालीदास बुरांडे, नासिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा, मंगेश भांडेकर, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतिश ढेंभुर्णे गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे या सह जिल्हयातील शंभराहून अधिक पत्रकार उपस्थित होते.