Tuesday, April 29, 2025
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना

गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

✍️गडचिरोली, दि. १७ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आजपासून सुरूवात करण्यात आली.

69-अहेरी मतदारसंघात 76 निवडणूक पथकातील 304 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या एम.आय.-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने 14 बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

यावेळी निवडणूक विभागाद्वारे मतदान पथकातील अधिकाऱ्यांचे बँडबाजा, पुष्पहार व औक्षण करून स्वागत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार संघातील 972 मतदान केंद्रापैकी 211 मतदान केंद्रावर 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व मतदान साहित्य पोहचविण्यात येणार आहे. अहेरीत आज 76, उद्या 25 व 19 नोव्हेंबर रोजी 44 पथकांना एअर लिफ्ट करण्यात येत असून गडचिरोली मतदारसंघात 18 नोव्हेंबर रोजी 13 पथके तर आरमोरी मतदार संघात 18 नोव्हेंबर रोजी 39 पथके व 19 नोव्हेंबर रोजी 14 पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहचविण्यात येत आहे.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

गडचिरोली – आज वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!

ओ*गडचिरोली - वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!* गडचिरोली, दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...

माजी आमदार कृष्णा गजबे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा चर्चेत ३ कोटींचा निधी मंजूर..

गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३...

Recent News

Most Popular

Recent Comments