चला तर मग सुरवात करूयात, पटतंय का पाहुयात..!
सुरुवात आपल्या सभोवतालचा एक प्रश्न मांडून करायची. खराब रस्ते, तुटके फुटपाथ, पाणी टंचाई, पाणी गळती, परिवहन समस्या, वाहतूक कोंडी, वाकलेलं झाड, एखादा अपघातास कारणीभूत ठरेल असा वीजेचा खांब, शेती, व्यवसाय, फेरीवाले, गतीरोधक, सिग्नल, गुन्हे, सुरक्षा….विषय काहीही असू शकतो.
इझमबिझमच्या चर्वितचर्वनात आपले प्रश्न हरवू देऊ नका. विचार करायला सुरुवात केलीत तर संपणार नाही इतकी यादी होऊ शकते. रोजच्या जीवनातले किरकोळ पण महत्वाचे प्रश्न. कधी जागरूक नागरिक म्हणून सूचनाही असू शकतात. हे विषय तथाकथित बड्या वृत्तवाहिन्यांवर येणार नाहीत. ते आपले आपणच मांडायचे. हातातल्या मोबाईलचा त्यासाठी परिणामकारक वापर करा.
बोलता येत नाही वगैरे न्यूनगंड बाळगू नका. मोडक्यातोडक्या भाषेत का होईना, पण प्रश्न मांडायला सुरुवात करा. राजकीय नेत्यांची बेताल वक्तव्ये, भावना भडकवणारी आव्हाने प्रतिआव्हाने, विद्वेषी चर्चा दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्या पाहणं बंद करा. समाजमाध्यमाला, आपल्या फेसबुक वाॅलला, वाॅटस्एप ग्रुप, ब्राॅडकास्ट लिस्टला, स्टेटसला किंवा युट्यबला स्वतःचं चॅनल बनवा.
यापुढे….द्वेष नव्हें, तर देश प्राधान्यावर असू द्या!
चला तर सुरू करूया… आपली चळवळ, आपला मीडिया !
भरत दयलानी…
????????