गडचिरोली:तालुक्यातील झेंडेपार टेकडीवर लोहखाण सुरू करतील या भीतीने तेथील आदिवासींमध्ये भीती व्यक्त केली. शुक्रवारी पार पडलेल्या राव पाट गंगाराम यात्रेत ९० ग्रामसभांनी यावर चिंता व्यक्त करीत कडाडून विरोध दर्शवला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५ खाणी प्रस्तावित आहे. सूरजागडनंतर आता उर्वरित खाणी सुरू करण्याबाबत काही कंपन्या उत्सुक असून त्यांनी त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आदिवासींमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. येथील झेंडेपार गावनजिक असलेल्या टेकडीवर लोहखनिजाचे साठे आहेत. २०१७ मध्ये एका कंपनीला येथे उत्खननाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे उत्खनन सुरू होऊ शकले नाही. परंतु सूरजागडच्या प्रयोगानंतर आता सुद्धा टप्प्याटप्प्याने उत्खनन सुरू करेल, अशी भीती येथील आदिवासींना आहे. या टेकडीवर आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या ‘राव गंगाराम पाट’ यात्रेत ही खदखद बाहेर आली. यावेळी तालुक्यातील २ इलख्यातून आलेल्या प्रशासनाला विकासच करायचा असेल तर आधी याभागात शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा आदी विकसित करा अशी ९० ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी एक बैठक घेत खाणविरोधी भूमिका मांडली.प्रशासन झेंडेपारमध्येकराव्या, गौण वन उपाजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारावे. पण खाणी सुरू करून परिसर उध्वस्त करू नये, अशी मागणी ग्रामसभांनी केली आहे. बैठकीला दलित आदिवासी आर्थिक आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक प्रा. डॉ. गौतम कांबळे, कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे, प्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर, माजी जिप सदस्य अनिल केरामी, राजराम नैताम महाग्रामसभा अध्यक्ष, बुकवू होळी, गोंबनसिंग होळी ग्रामसभा सदस्य भरीटोला, डॉ, सतीश गोगुलवार, सरील मडावी सरपंचसह नादळी हे प्रामुख्याने ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
