तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी विलास गोंदोळे
#गडचिरोली: मराठा सेवा संघ द्वारा प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,तानुबाई बिरजे पत्रकार परिषद अध्यक्ष सुनिल जी.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विलास (दादा) पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील दौ-यादरम्यान जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभवी युवा पत्रकार तथा विधायक न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांची तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली.त्यांना नियुक्तीपत्र मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विनायक बांदूरकर यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रादेशिक दैनिकात तालुका बातमीदार ते उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.तसेच आरमोरी तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध समस्यांवर विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे.सद्यस्थितीत ते सोशल मिडियावर विधायक न्यूज या ब्लॉग व युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.सामाजिक, शैक्षणिक, कृषी उद्योजक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सदर पदावर निवड करण्यात आली.
झालेल्या निवडीबद्दल मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष दादाजी चापले,इंजि.पांडुरंग नागापूरे, कार्याध्यक्ष इंजि.सुरेश लडके, जिल्हा सचिव प्रा.विजय कुतरमारे,गोकुळदास झाडे, शालिग्राम विधाते,
प्रा.शेषराव येलेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, चंद्रकांत शिवणकर, दादाराव चुधरी,राजेंद्र उरकुडे,प्रा.डाॅ.दिलीप चौधरी, मंडळ अधिकारी किशोर ठाकरे,प्रा.डाॅ.दिपक गोंदोळे, विजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर गोंदोळे,ऍड.हिवराज बोरकर, विनायक पेलणे, निखिल सहारे, युवा रंग चे अध्यक्ष राहुल जुआरे, माकपाचे अमोल मारकवार,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनकर, पत्रकार हरेंद्र मडावी, विधायक न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक दिनेश देशमुख, उपसंपादक लिलाधर मेश्राम, पंकज इंदूरकर, उमेश दुमाने,चंदु बोकडे,टिकाराम सांगोळे,वामन राऊत,सतिश पेंदोरकर, निलकंठ
गोहणे,सुरज पडोळे,हिराजी गोहणे, राजेश नाकाडे, मंगेश वासेकर, तसेच बहुसंख्य मित्रमंडळी व कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.
