दत्ताजी डिडोळकरांचे नाव देण्याचा ठराव रद्द करणार – कुलगुरू डॉ. बोकारे यांचे लेखी आश्वासन !
आदिवासी कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांचे उपोषण मागे.
गडचिरोली:कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आज दुपारी 3 वा. उपोषण मंडपाला भेट देऊन पत्र कुलसंगे यांना सुपूर्त केले व त्यांना निंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.
या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हीरेखन, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, डॉ. दिलीप बारसागडे, बीआरएसपी चे प्रभारी राज बंसोड , अभारीपचे हंसराज उंदीरवाडे , ठाणेदार अरविंद कुमार कतलाम, आदिवासी एम्प्लॉयीस फेडरेशन चे सदानंद आराम, आदिवासी कर्मचारी संघटनेचे नेते माधवराव गावड, आदिवासी युवा विकास परिषदेचे कुणाल कोवे, नागसेन खोब्रागडे, प्रतीक डांगे, सुधा चौधरी, प्रदीप भैसारे, साईनाथ पुंगाटी, नामदेव उसेंडी , पोर्णिमा कुलसंगे, वासुदेव कोडापे, विनोद मडावी , शोभा खोब्रागडे, धनश्याम खोब्रागडे लँकेश मडावी , डेव्हिड पेंद्राम , बादल मडावी , नीता सहारे, वंदना झाडे, अशोक खोब्रागडे, कविता खोब्रागडे व अन्य बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

