✍️देसाईगंज:छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एखाद्या आख्यायिकेप्रमाणे भासते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता महाराजांनी असे पराक्रम करून दाखवले आहेत, जे केवळ ऐकल्यामुळे अनेकांच्या भुवया आजही उंचावतात. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली, तरी त्यांनी शांत राहून त्यातून मार्ग काढला. सकारात्मक गोष्टींचा आग्रह धरला. शिवाजी महाराजांची देवावर अगाध श्रद्धा होती. त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळत असे.
आज देसाईगंज तालुक्यातील एकलपुर या ठिकानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला अभिषेक करुण माल्यापर्ण व पुष्पार्पण करत जय शिवराय चा जयघोष करत आम आदमी पार्टी देसाईगंज तालुक्यातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी आम आदमी पार्टी चे भरत दयलानी, दीपक नागदेवे,प्रमोद दहिवले, अतुल ठाकरे, वामन पगारे, शेखर बारापत्रे,सौरव साखरे, चंदू ठाकरे, बारकृष्ण भंडारकर व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते।
![](https://desaiganjsangharsh.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0428-1024x480.jpg)
![](https://desaiganjsangharsh.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230219-WA0421-1024x480.jpg)