देसाईगंज – युवक काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांच्या सूचनेनुसार देसाईगंज युवक काँग्रेस कमिटीच्या शहरअध्यक्ष पदावर युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते यांनी विक्की डांगे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे.
विक्की डांगे यांच्या कार्याची दखल घेऊन, जनसामान्य, समाजाप्रती त्यांची तळमळ पाहू जाता पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता, युवकांना काँग्रेसच्या विचारधारेशी जुळवून, काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून, तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांची नुकतीच नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी आमदार आनंदराव गेडाम, गडचिरोली काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, कुणालदादा राऊत अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, लॉरेन्सभाऊ गेडाम जिल्हाअध्यक्ष युवक काँग्रेस गडचिरोली, साहीलदादा वारजूरकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा प्रभारी गडचिरोली, विश्वास भोवते माजी समाजकल्याण सभापती गडचिरोली, रजनीकांत मोटघरे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनु.जाती सेल, नरेंद्र गजपूरे युवकांचे मार्गदर्शक तथा माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष देसाईगंज, राजेंद्र बूल्ले अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज, परसराम टिकले मा. तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, नितीनभाऊ राऊत तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, अक्षयभाऊ भोवते युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आरमोरी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, तालुका युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटी च्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक आदींना दिले आहे.