# गडचिरोली :दिनांक 7 फेब्रुवारी मंगळवारी गडचिरोली शहरात समाज कल्याण विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विवीध वसतिगृहातील विद्यार्थ्यानी अपुऱ्या सोयीसुविधामुळे त्रस्त होवून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी महोदयाकडे आपल्या समस्यांचा पाढा वाचून त्या समस्या सोडविण्याची विनंती केली. परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी हा विभाग माझ्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगितल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला. खरे तर शासन, प्रशासन हे जनतेचे नोकर आहेत जनतेच्या समस्या ऐकून त्या समस्या सोडविणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.. परंतु जनतेला मात्र प्रत्यक्षात असा अनुभव कधी येताना दिसत नाही. खरे तर हा नोकरशाहीचा पराभव आहे.गडचिरोली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून प्रशासन जनहितार्थ नसल्याचेच जास्त अनुभवास येत आहे. आदिवासीं बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी केलेले आंदोलन असो की शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या मागण्या असो की विद्यार्थ्यानी आपल्या समस्या पूर्तीसाठी केलेले आंदोलन असो प्रशासनाने संमजसपणाची भुमिका न घेता नेहमी आडमुठेपणाची भुमिका घेतल्याचेच दिसून येत आहे.
त्यामुळें गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव, शेतकरी, विदयार्थी यांना कुणीही वाली उरला नसल्याचे चित्र सद्या जिल्ह्यात आह
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....