माना समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरावी आ.कृष्णा गजबे.
माना समाजाच्या वतीने नागदिवाळी महोत्सव कार्यक्रम संपन्न
आरमोरी-आजचे युग स्पर्धेचे युग आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर माना समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादनआ.कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.
माना आदिम जमात मंडळ ग्रामशाखा आरमोरी, माँ. माणिकादेवी मंदिर समिती आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथील महादेवगड देवस्थान डोंगरी येथील प्रांगणात नागदिवाळीअमृत महोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन स्थानावरून ते उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना आदिम जमात मंडळ शाखा आरमोरीचे अध्यक्ष गिरीधर नन्नावरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी न.प.चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, चारुदत्त राऊत,बांधकाम सभापती सागर मने,माना आदिम जमात मंडळाचे कुरखेडा तालुकाध्यक्ष गुणवंत दडमल, वडसाचे तालुकाध्यक्ष हिरामण गराटे, आरमोरी पं स.चे बांधकाम शाखा अभियंता प्रवीण झापे,नगरसेविका प्रगती नारनवरे, सुनीता मने,पत्रकार रुपेश गजपुरे,खेमराज जांभुळे,प्रदीप नन्नावरे,वाघ गुरुजी, आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम आ.गजबे यांनी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा व माना समाजाची देवी माँ मानिकादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली.
प्रमुख अतिथी ठाणेदार काळबांडे म्हणाले की,माना समाज हा निसर्गाच्या सानिध्यात राहणार समाज आहे.या समाजातील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीची दिव्य ज्योत कायम ठेवावी.
नगराध्यक्ष पवन नारनवरे म्हणाले की,फार पूर्वीपासून जंगलात राहणारा वस्त्र शून्य समाज म्हणजे आदिवासी समाज अशी एकेकाळी आदिवासी समाजाची ओळख होती. मात्र आता आदिवासींनीही आपली वाट बदलून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून १० वी १२ वितील प्रावीन्यप्राप्त विद्यार्थी हर्षल चौके,मोनिका ननावरे,आदिती नन्नावरे, गायत्री गायकवाड,निखिल शेरकुरे,प्राची नारनवरे, ऋतुजा गजबे,चैतन्य ढोक यांना शिल्ड,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.एम .एम.एस. परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या जयंत धाडसे व शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या अल्पेश धारने या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.तसेच माँ. माणिका देवी माता मंदिराची निगा व सेवा करणाऱ्या संगीता ढोणे या महिलांना साडी चोळी देऊन गौरविण्यात आले.याच कार्यक्रमानिमित्त समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात समाजातील २० रक्तदात्यांनी रक्तदान केले.यानंतर समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम,गोपालकाला व सामुहिक भोजन कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन रवी नारनवरे, सूत्र संचालन प्रशांत नारनवरे, प्रास्ताविक गौरव नारनवरे तर आभार चेतन हजारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर दोडके,
आनंदराव श्रीरामे, राजू चौके , सुहास वाघ, अरुण चौके, राकेश मंगरे, विशाल गायकवाड, व्यंकटेश घरत, भारत राणे, सौरभ श्रीरामे, विशाल ढोक, धनराज गरमळे, विशाल गायकवाड, शेषराव नारनवरे,रवी नारनवरे, मुकरू चौके, सचिन गायकवाड, विश्वनाथ श्रीरामे, प्रकाश श्रीरामे, मनोहर गरमडे, झापे साहेब ,श्रावण रंधये, शेषराव नारनवरे, तिलकचंद्र चौधरी, ज्ञानेश्वर घरत, अनिल मंगरे, गोपाल चौके, अक्षय गायकवाड, पुष्पा वाघ, वंदना राने, रजनी चौके, मंगला गरमडे, बेबी रंदये , मधुकर दडमल, गजानन राणे, वामन रंधये, दिवाकर गरमडे, रवी चौके, दिलीप जांभुळे, सौरभ श्रीरामे, टिंकू चौके, रुपेश वाकडे, शालिक गरमडे, दीपक घोडमारे शामराव धारणे, चेतन हजारे, गोपाल नारनवरे, राकेश गरमडे, रवी गराटे, मोरेश्वर चौके, राजू शेरकुरे, धनंजय गुडळे, प्रकाश रंधये,अनिल मंगरे, यांनी अथक परिश्रम घेतले.