गडचिरोली:स्वतःचे घर हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घरांची संकल्पना मांडली आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत असे सांगून हे सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल असणारा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यंत्रणांनी जोमाने काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिले होते।गरिबांना हक्काचे छप्पर लाभावे या दृष्टिकोनातून घरकुले बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जात असल्याचे सरकार दरबारी सांगण्यात येत असून तरी प्रत्यक्षात घरकुलाच्या लाभार्थ्यांची पदोपदी अडवणूक होत असून घरकुलाच्या जागेपासून ते मिळणाऱ्या निधीपर्यंत असंख्य अडथळे लाभार्थ्यांना पार करावे लागत आहेत.घरकुलांचा लाभ देताना अनेकदा प्रशासकीय यंत्रणेकडून निर्देशांची पायमल्ली होत आहे.नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके यांनी आरमोरी येथील डोंगरी परिसरात गरजू लाभार्थ्यांना घरकुलच्या अर्ज देत नसून लाभार्थ्यांचे अर्ज नगरपरिषद आरमोरी हे स्वीकारत नाही। त्यामुळे सदर लाभार्थी घरकुल पासून वंचित आहेत। नगरपरिषद होऊन तीन वर्षाच्या कार्यकाल झाला तरी डोंगरी परिसर हा गावठाण मध्ये असून सुद्धा त्या जागेची मोजणी झाली नाही। पन्नास वर्षापासून लोक डोंगरी परिसरात राहून सुद्धा त्यांना पट्टे देण्यात आले नाही सिटीसर्वे ने मोजणी सुद्धा केलेली नाही। तरी या सर्व विषयाकडून चर्चा करून माननीय शिंदे साहेबांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले
????????????????