Gadchiroli News: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्पमध्ये प्रसूतीनंतर हत्तीच्या पिलाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने संपूर्ण वनविभागात एकच खळबळ माजली आहे. एकाच हत्तीनीच्या तिसऱ्या पिलाचाही मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये हत्तीनीच्या प्रसुतीनंतर पिलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मंगला नावाच्या हत्तीनीच्या प्रसूतीनंतर तिचं पिलू मृतावस्थेत आढळलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कमलापूर येथील वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये एकूण आठ हत्तींचा समावेश होता. येथे असलेल्या मंगला नावाची हत्तीनी मागील काही महिन्यांपासून गरोदर होती. काल २६ फेब्रुवारी रोजी जंगलात प्रसूती झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी येथील कर्मचारी हत्तीकॅम्प परिसरात हत्तींना आणण्यासाठी जंगलात गेले असता त्याचा पिलू मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हत्तीच्या पिलाला शवविच्छेदनासाठी रेपनपल्ली येथे आणल्याची माहिती आहे. पूर्वी या हत्ती कॅम्पमध्ये एकूण दहा हत्तींचा समावेश होता. मात्र, २९ जून २०२० ला ‘आदित्य’ नावाच्या चार वर्षी हत्तीचा पिलांचा मृत्यू झाला होता. ३ ऑगस्ट २०२१ ला ‘सई’ तर ६ ऑगस्ट २०२१ ला ‘अर्जुन’ नावाच्या हत्तीच्या पिलाचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत वन्यप्रेमींनी उच्चस्तरीय चौकशीची मागणीही केली होती. विशेष म्हणजे यापूर्वी मृत्यू झालेले हत्तीचे पिले आदित्य आणि अर्जुन हे मंगला आणि अजितचे अपत्य होते आणि आज पुन्हा एकदा मंगला आणि अजित नावाच्या हत्तीच्या मादी पिलाचा बळी गेला आहे,
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...