Wednesday, January 15, 2025
Homeगडचिरोलीरेझिंग डे निमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभागात गडचिरोलीत...

रेझिंग डे निमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभागात गडचिरोलीत करण्यात आले पथसंचलन. ???????

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

gdchirolipolice #policemarch

#gdchirolipolice #policemarch गडचिरोली:रेझिंगडे निमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभागात गडचिरोलीत करण्यात आले पथसंचलन
दिनांक ०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. आज गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले.
सदरचे पथसंचलन हे गडचिरोली शहरातील कारगील चौकापासुन सुरु होऊन इंदीरा गांधी चौक ते बस स्थानक येथुन परत इंदीरा गांधी चौकात सांगता करण्यात आली. सदर पथसंचलनात पोलीस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतुक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटुन, बँड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटुन, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी बँड पथकाच्या देशभक्तीपर धुन वरती शिस्तबद्ध पथसंचलन केले. या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस स्टेशन गडचिरोली, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हिक ऍक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल इ. शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच विद्याभारती कन्या हायस्कुल, फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, शिवाजी ज्युनियर सायन्स कॉलेज व महिला महाविद्यालय गडचिरोली येथील २५० विद्यार्थी- विद्यार्थीनीनी आपला सहभाग नोंदविला.
सदर पथसंचलनामध्ये मा,ननीय पोलीस अधीक्षकांसोबतच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मा. श्री. अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) मा. श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. प्रणिल गिल्डा सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा श्री. स्वप्नील जाधव सा., प्रभारी अधिकारी, पोस्टे गडचिरोली श्री. अरविंद कतलाम व राखीव पोलीस निरिक्षक श्री. विठ्ठल मुत्यमवार हे उपस्थित होते.

???????????????????

???????????????????

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments