✍️आरमोरी:- दिनांक 14 फरवरी 2023 श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी येथे मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली “मातृ-पितृ पूजन दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळा समितीचे उपाध्यक्ष श्री विलासजी गोंधोळे सर तसेच श्री साईनाथजी अद्दलवार सर मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय आरमोरी. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितीनजी कासार सर मुख्याध्यापक व वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी तसेच शाळेचे सुपरवायझर श्री किरणजी मांडवकर सर तसेच विद्या राकडे मिस यांनी स्थान भूषवले. या कार्यक्रमामध्ये वर्ग नर्सरी ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री विलाजी गोंधोडे यांनी आपल्या भाषणातून मातृ पितृ दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्याना समजून दिले. त्यानंतर श्री साईनाथ जी अद्दलवार सर यांनी आई-वडिलांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे तसेच त्यांच्याशी कसे वागावे त्यांची कशी काळजी घेतले पाहिजे हे फार सुंदर शब्दात समजून सांगितले त्यानंतर वर्ग ८वी ६वी च्या विद्यार्थ्यांनी खुप सुंदर नृत्य प्रदर्शित केले. त्यानंतर शाळेचे संगीत शिक्षक हेमंत सर यांनी आपल्या मधुर आवाजात आई-वडिलांवर आधारित गीत प्रस्तुत केले. त्यानंतर लगेच उपस्थित पालकांचे त्यांच्या पाल्यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली व वातावरणात एक भावुकता निर्माण झाली सर्व पालकांनी आपल्या चिमुकल्या पाल्यांना आशीर्वाद देऊन मातृ पितृ प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संचालन मनिषा दडमल यांनी केले व आभार प्रदर्शन स्नेहा सुखदेव यांनी केले व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमास कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....