✍️आरमोरी – स्थानिक श्रीमती.वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी मध्ये संस्थाध्यक्ष, उपाअध्यक्ष, सचिव व मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळचे सर्व संचालक व मुख्याध्यापक,सहल विभाग समिती यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक सहल ही “द टायगर पॅराडाईज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क तिरखूरा, उमरेड ,नागपूर.” इथे नेण्यात या सहलीमध्ये वर्ग १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. “द टायगर पॅराडाईज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क” मध्ये मुलांच्या खेळण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी दोन विभागांमध्ये त्याची विभागणी होती. त्यामध्ये “वाटर पार्क” व “एडवेंचर पार्क” याचा समावेश होता. “वॉटर पार्क” मध्ये वॉटर प्ले स्टेशन, रेन डान्स, वेव फुल, टॉवर्स स्लाइड, लेझी रिवर, यांचा समावेश होता आणि मुलांनी खूप मनसोक्त या सगळ्यांचा आनंद लुटला. त्यानंतर “एडवेंचर पार्क” मध्ये जीप लाईन, रोप सायकल, रोप कोर्स, कमांडो नेट, हॉरर हाऊस, मिरर हाऊस, कॅमेल राईड, हॉर्स कार्ट यांचा सुद्धा विद्यार्थ्यानी मनमुराद आनंद लुटला. मुलांना खानपान नियोजात सकाळच्या नाष्टा,जेवण तसेच सायंकाळी नाष्टा अशी व्यवस्था करण्यात आली होती. मुलांना प्रवास नियोजनात प्रवासासाठी आरमोरी ते द टायगर पॅराडाईज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क तिरखुडा, उमरेड,नागपूर पर्यंत ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच मुलांच्या सुरक्षा व काळजीघेण्यासाठी सर्व वर्गशिक्षक तसा सहाय्यक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला. शैक्षणिक सहलीला यशस्वीरित्या करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...