✍️आरमोरी – स्थानिक वत्सलाबाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे दिनांक 23/02/ 2023 रोजी संत गाडगेबाबांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक किरण मांडवकर सर व रविकांत म्हस्के यांनी स्थान भूषविले कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन कासार सर यांनी संत गाडगेबाबांच्या जीवन चरित्रावर विस्तृत असे मौलिक मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे वर्ग ७वी ची विद्यार्थिनी कु. दिव्यांशी दिवटे हिने सुद्धा गाडगेबाबांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव करून देणारे भाषण विद्यार्थ्यांसमोर केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका ज्ञानेश्वरी बांते यांनी तर आभार हेमंत खोब्रागडे सर यांनी मानले राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...