⚜️श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा.⚜️
आरमोरी – दिनांक 31 डिसेंबर 2022 व 1 जानेवारी 2023 रोजी स्थानिक श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन से समलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वर्ग नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक माननीय श्री मनोजभाऊ वनमाळी यांच्या हस्ते करण्यात आले त्यात सर्वप्रथम महात्मा गांधी,संत तुकडोजी महाराज,स्वर्गीय वामनरावजी वनमाळी यांच्या पुतळ्याची पूजन करण्यात आले तसेच स्वर्गीय किशोर भाऊ वनमाळी यांच्या प्रतिमेला मारल्या पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर लगेच सभागृहात प्रवेश केल्यानंतर माता सरस्वती,श्रीमती वत्सलाबाई वनमाळी,स्वर्गीय श्री वामनरावजी वनमाळी आणि स्वर्गीय श्री किशोर भाऊ वामनराव जी वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर आमंत्रित मान्यवरांनी आपआपले स्थान ग्रहण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री मनोज भाऊ वामनरावजी वनमाळी होते तर विशेष अतिथी म्हणून श्री दीपक भाऊ बेहरे ,श्री नामदेवरावजी सोरते ,श्री उमाकांजी वनमाळी, श्री मयूरजी वनमाळी, सभासद मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी तसेच,श्री साईनाथजी अद्दलवार सर प्राचार्य महात्मा गांधी हायस्कूल आरमोरी श्री. आंबोळकर सर उपप्राचार्य महात्मा गांधी हायस्कूल आरमोरी श्री.प्रकाशजी पंधरे सर मुख्याध्यापक महात्मा गांधी कन्या शाळा कन्या विद्यालय आरमोरी,सौ.दुर्गाताई लोणारे नगरसेविका आरमोरी श्री संजय लोणारे व श्री.नितीनजी कासार सर मुख्याध्यापक व वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरीत सौ.रजनीताई हरिश्चंद्रजी बोंद्रे सौ.ताराबाई उमाकांजी वनमाळी, श्रीमती.गीताताई गारोदे यांची उपस्थिती होती सर्वप्रथम स्वागत गीताने तसेच पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीनजी कासार सर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले आणि कार्यक्रमाविषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर श्री मनोज भाऊ वामनरावजी वनमाळी यांचे अध्यक्ष भाषण झाले व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली वर्ग नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर नृत्य प्रस्तुत करून कार्यक्रमात रंगत आणली सर्व विद्यार्थ्यांनी भिन्नभिन्न भाषा व संस्कृतीतील नृत्य, नाटक, एकपात्री अभिनय प्रस्तुत करून सर्व प्रेक्षकांना आकर्षित केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कार्यक्रमाची संचालन रविकांत म्हस्के सर,किरणजी मांडवकर सर , गुलनाज शेख, मिनाझ शेख, मनीषा दडमल,नूतन शेंडे,सविता पानसे, ललिता भोयर नीलिमा सोरते तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग्यश्री शेंडे व जागृती नंदेश्वर यांनी केले.
आभार प्रदर्शन सुनिता टिचकुले व विद्या राकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरता शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.