# gadchiroli hemadpnthi# गडचिरोली:गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. वडधापासून सात किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथी किल्ल्यामध्ये निघतो असे सांगितले जाते, वैरागड ते मरेगावचे अंतर २५ कि आहे. रामाला १४ वर्षांचा वनवास झाला. तेव्हा याच
मंदिरात असल्याच्या आख्यायिका या मंदिरामध्य सांगितल्या जातात. ४५ ते ५० वर्षांपूर्वी या भुयारातून शिरलेली शेळी सरळ वैरागडच्या किल्ल्यात निघली होत असेही सांगितले जाते. या मंदिराच्या आख्यायिका अनेक सांगितल्या जात असल्या तरी सदर मंदिर पुरातन काळातील शिल्पकलेचा बेजोड नमुना मानला जातो. येथील दगडांवर अनेक प्रकारच्या मूरर्त्या कोरण्यात आल्या आहेत. मात्र देखभाल व दुरूस्तअभावी या मंदिरावरील दगड हळूहळू कोसळत चालले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे
gadchiroli
???????????????????