सामाजिक कार्यकर्ता मनोज महादेवराव ढोरे यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश
देसाईगंज येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ६० व्या व शिवानी विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता मनोज महादेवराव ढोरे यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या पक्षात श्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित माजी आमदार तथा आदिवासी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते,ओबीसी विभाग जिल्हा अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी सभापती परसराम टिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रभाकर तुलावी, युवक काँग्रेस सहसचिव कुणाल पेंदोरकर, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके,आरमोरी तालुका काँग्रेस मिलिंद खोब्रागडे, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, राजूभाऊ राशेकर, माजी नगरसेवक हरीश मोटवानी, दिलीप घोडाम,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास ढोरे, विसोरा गावचे उपसरपंच संजय करांकर ,नितीन राऊत माजी उपसभापती पंचायत समिती युवक शहर अध्यक्ष पिंकू बावणे यांच्या समक्ष पक्षाचा दुपट्टा घालून पक्षप्रवेश करण्यात आला