???????????????????
⚜️श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे “शालेय विज्ञान व हस्तकला “प्रदर्शनीचे आयोजन ✍️आरमोरी:दिनांक 28 डिसेंबर २०२२ रोजी स्थानिक श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर येथे “शालेय विज्ञान तसेच हस्तकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापकांच्या तसेच विज्ञान विषय प्रमुख गुलनाझ शेख व विज्ञान शाखाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वर्ग 3री ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूपच छान अप्रतिम विज्ञानाचे मॉडेल्स प्रस्तुत केले. तसेच
वर्ग नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना हस्तकला प्रदर्शनी चे सुद्धा आयोजन केले होते. हस्तकला विभाग प्रदर्शनीचे प्रमुख नैमा पठाण तसेच हस्तकला शिक्षिका,शिक्षक यांनी हस्तकला प्रदर्शन चे आयोजन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले शाळेचे मुख्याध्यापक श्री.नितीनजी कासार तसेच प्रमुख पाहुणे विज्ञान परीक्षक श्री. गुरूनुले सर, जयश्री आत्राम मॅडम तसेच हस्तकला परीक्षक हर्षल गेडाम सर म्हणून लाभले.
त्यांनी मुलांना त्यांच्या या कार्याबद्दल शाब्बास दिली व प्रदर्शनीचे उद्घाटन केले.
मुलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रदर्शनीची शोभा वाढवली.
पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना प्रदर्शनी दाखवण्यास मोठ्या उत्साहाने आणले व मुलांचे मनोबल वाढवले. निरीक्षकांनी प्रत्येक मॉडेल चे परीक्षण करून त्यांना योग्य मूल्यांकित केले.
विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षण श्री. महेश गुरनुले सर व कू.जयश्री आत्राम मॅडम यांनी केले.
आणि हस्तकला प्रदर्शनीचे परीक्षण हर्षल गेडाम सर व नैमा पठाण मॅडम यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शन या दोन्ही कार्यक्रमाचे संचालन सोनाली फोपसे व ज्ञानेश्वरी शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पपीता बुल्ले यांनी केले.
संगीत विभागाचे प्रमुख श्री. हेमंत खोब्रागडे सर यांनी राष्ट्रावंदना गाऊन
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमासाठी सर्व विद्या शाखेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मोलाची सहकार्य केले.
???????????????????