# armori vatlsabai vanamari school⚜️श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.⚜️ ✍️आरमोरी – दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी स्थानिक वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन कासार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक किरण मांडवकर तथा रविकांत म्हस्के सर यांनी स्थान भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन करून उपस्थितांच्या हस्ते माल्याअर्पण करुन करण्यात आली. शाळेचे शिक्षक रविकांत म्हस्के यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन करून सावित्रीबाईच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तर वर्ग 7वी ची विद्यार्थिनी कुमारी केतकी माकडे हिने सुद्धा सावित्रीबाई फुले आणि महिला शिक्षण या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली त्याचप्रमाणे किरण मांडवकर सर तथा कार्यक्रमाध्यक्ष मुख्याध्यापक नितीन कासार सर यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक योगदान या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्या राकडे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार अमित राऊत सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...