⚜️श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे “विद्यार्थी व पालक खेळ दिवस “साजरा*⚜️
✍️आरमोरी:दिनांक २५ डिसेंबर 2022 स्थानिक श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी येथे “पालक खेळ दिवस” साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीनजी कासार यांनी भूषविले आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री हरिश्चंद्र बोंद्रे सर व सौ. रजनीताई हरिश्चंद्र बोंद्रे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या पालक खेळ दिवसानिमित्त मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.यादिनानिमित्त शाळेत विविध प्रकारचे खेळ राबविण्यात आले. त्यात चमचा गोळी,संगीत खुर्ची आणि बॉम्ब ब्लास्ट अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला. याप्रसंगी पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रत्येक खेळात सहभाग घेतला. प्रत्येक खेळामध्ये दोन दोन विजेते घोषित करण्यात आले. याप्रसंगी विविध खेळांचे संचालन श्री.रविकांत म्हस्के,सौ. नूतन शेंडे,सौ. सोनाली फोपसे आणि सौ. स्नेहा सुखदेवे यांनी केले. पाहुण्यांचे तसेच पालकांचे स्वागत सौ.मीनाज शेख यांनी शब्दसुमनांनी केले. आभार प्रदर्शनाचे कार्य शाळेचे संगीत शिक्षक हेमंत खोब्रागडे यांनी केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगना करण्यात आली.