Friday, January 17, 2025
HomeगडचिरोलीAdmission to bhosla military school started

Admission to bhosla military school started

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

[ad_1]

नाशिक, 25 जून : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकालानंतर तुम्ही जर NDA चे (नॅशनल डिफेंस अकॅडमी) प्रिप्रेशन करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भोसला मिलिटरी कॉलेज (Bhonsala Military College) मध्ये NDA प्रिप्रेशन बॅचची (NDA-Preparation Bach) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या बॅचला प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छित असाल तर, महाविद्यालयीन अभ्यासासोबतच तुम्ही  NDA ची देखील तयारी करू शकता. अकरावी बारावी अशी दोन वर्षे तुमची तयारी करून घेतली जाईल.

फी किती आणि किती विद्यार्थ्यांना प्रवेश?

NDA प्रिप्रेशन बॅचची एका वर्षाची फी 1 लाख 95 हजार रुपये आहे. यात तुमची प्रवेश फी आणि होस्टेल फीदेखील समाविष्ट असेल. या फीमध्ये तुम्हाला वर्षभरात लागणाऱ्या सर्व वस्तू कॉलेजकडून दिल्या जातील. यात कोर्ससाठी रिझर्व्हेशन नाही. सर्व प्रवेश हे ओपनमध्ये केले जातात. 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. 

तुमच्या शहरातून (नाशिक)

वाचा : Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL

प्रवेश घेण्यासाठी पात्रता 

NDA प्रिप्रेशन बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही दहावी किती गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. हे महत्वाचे नसते. भोसला मिलिटरी कॉलेजकडून एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात NDA मध्ये जे प्रश्न विचारले जातात. त्यात किती मार्क्स पडतात, हे बघितले जाते. त्यावरून प्रवेश निश्चित केला जातो.

शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता

1 ) प्रवेश परीक्षा यामध्ये विद्यार्थाला सर्व विषयांचे ज्ञान आहे का, त्याची पडताळणी होते.

2) मुलाखतीमध्ये विद्यार्थी बोलतो कसा, स्पष्ट बोलतो का? त्याची NDA मध्ये जाण्याची खरंच इच्छा आहे का? या गोष्टी तपासल्या जातात.

3) शारीरिक चाचणी परीक्षेत विद्यार्थी शारीरिक दृष्टया सक्षम आहे ना, काही व्यंग तर नाही ना, म्हणजे सैन्य भरतीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसारखी पूर्ण पडताळणी केली जाते. हे सर्व झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांची निवड  झाली आहे. त्या विद्यार्थ्यांना एक तारीख देऊन भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये जॉईन होण्यास सांगितलं जाते.

वाचा : raju shetti : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले, प्रोत्साहन अनुदानासाठी जाचक अटी, राजू शेट्टींची खरमरीत टीका

अशी आहे प्रवेश प्रक्रिया

भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथमत:  bmc.bhonsala.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून मेरिट फॉर्म भरा. त्यानंतर प्रवेश परीक्षेसाठी कॉलेजकडून तुम्हाला संपर्क केला जाईल. चौकशीसाठी विक्रांत कावळे मेजर मोबाईल क्रमांक 9890901079 आणि राम कुमार नायक कर्नल मोबाईल क्रमांक 9423163648  यावर संपर्क साधू शकतात. अधिक माहितीसाठी डॉ. मुंजे मार्ग, रामभूमी समर्थ नगर, मॉडेल कॉलनी नाशिक येथे भेट देवू शकतात.

विद्यार्थ्यांना राहण्याचीदेखील व्यवस्था 

विद्यार्थी कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याला सर्व वस्तू पुरवल्या जातात. त्याला कॉलेजमधील लागणार साहित्य काहीही बाहेरून घ्यावे लागणार नाही. आपण भरलेल्या शुल्कात या सर्व गोष्टींचा समावेश असेल.

बॅचमधील विद्यार्थ्यांचा दिनक्रम 

सकाळी 6 ते 7.30 मिनिटांनी मिलिटरी ट्रेनिंग, त्यामध्ये हॉर्स रायडिंग, स्विमिंग, फायरिंग, योगा, कराटे, मलखांब असे वेगवेगळे विषय शिकवले जातात. या प्रत्येक विषयाचे वेगवेगळे मार्गदर्शक असतात. मिलिटरी ट्रेनिंग झाल्यानंतर विद्यार्थी ब्रेकफास्ट करण्यास जातात. नंतर कॉलेजची तयारी करून सर्व विद्यार्थी होस्टेलमधून कॉलेजमध्ये जातात. लगेच  NDA चे क्लास सुरू होतात. ते झाल्यानंतर जेवण करण्यास वेळ दिला जातो. जेवण झाल्यानंतर विद्यार्थी पुन्हा आपल्या महाविद्यालयीन अभ्यासासाठी कॉलेजमध्ये येतात. पुन्हा रेग्युलर क्लास करून, चहा, नाश्ता करण्यासाठी वेळ दिला जातो. नंतर सायंकाळच्या वेळी स्पोर्ट्स खेळण्यास वेळ दिला जातो, असा एकंदरीतच विद्यार्थ्यांचा दिनक्रम असतो.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करतं?

होस्टेलमधील विद्यार्थ्यांना शिस्त लागण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये रिटायर्ड सैनिकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सैन्यात जाण्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजचे जे माजी विद्यार्थी सैन्यात अधिकारी पदावर आहेत. त्यांचंही मार्गदर्शन दिलं जात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments