वडेगाव स्टे✍️अर्जुनी मोर तालुक्यातील वडेगाव स्टेशन येथील सरपंच श्रीकांत लोणारे यांनी ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांसहित दिनांक 17 एप्रिल पासून पंचायत समिती आवारात आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांनी दिलेले निवेदनात म्हटले आहे की वडेगाव/स्टेशन येथील पंचायत समितीला नमुना ४ सादर केलेल्या मजुरांना काम न दिल्यामुळे त्यांना कायद्यानुसार बेरोजगार भत्ता देण्यात यावा.गट विकास अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीने निष्काळजीपना करून भ्रष्टाचाराला पाठींबा दिला त्याच्यावर शिस्त भंगावी कार्यवाही करुन त्यांना निलंबित करण्यात यावा. १४ वा वित्त आयोग आणि १५ वा वित्त आयोगाचा पैसा नियम बाह्य खर्च केल्यामुळे त्याची वसुली करण्यात यावी. जि.प. शाळेला आवारभिंत बांधण्याच्या नावावर दिलीप वालदे यांच्या भिंतीला रंगरंगोटी करून २,९१, २२४ रु. कण्यात आले त्याची वसुली करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.ग्रामपंचायतला टाईल्स फिटींगच्या नावाने पुर्ण पैसे काढण्यात आले पण काम पूर्ण केल्या गेले नाही. त्यामुळे त्याची वसुली करून त्याच्यावर कारवाही करण्यात यावी.अंगणवाडी डिजीटल करण्याच्या नावाने ३ दा बिल काढण्यात आले पण अंगणवाडी डिजीटल से साहित्य खरेदी केल्या गेले नाही. त्याची वसुली करण्यात यावी. वडेगांव स्टेशन येथे आरोग्य शिबीर न घेता आरोग्य शिबीराच्या नावाने पैसे काढण्यात आले त्याची वसुली करण्यात यावी. जि. प. शाळेच्या शौचालय बांधकाम पुर्ण न करता प्रशासकाच्या सहिने ५ लाख काढण्यात आला त्यामुळे संबंधिताकडून वसुली करून त्याच्यावर कारवाही करण्यात यावी.१४ वा वित्त आयोग १५ वा वित्त आयोगाच्या कामाची चौकशी करून संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यात यावा. दलीत वस्तीच्या निकृष्ठ रोडाची चौकशी करून त्याच्यावर वसुली करण्यात यावी.कु.एस. डी. वाढई ग्रामसेवक यांनी ग्रामसभेने पारीत केलेल्या ठरावाची अमलबजावनी केली नाही त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाही करण्यात यावी. ग्रामसेवक कु.एस.डी. वाढई मुख्यालयात राहन नसतांना सुध्दा HRA घरभाडे उचल करून शासनाची दिशाभुल करण्यामुळे त्याच्याकडुन HRA ची वसुली करून शासनाच्या निधीचा गैरवापर
करण्यात आल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.