कूरखेडा शहर विचार मंचाचा वतीने प्रंचित पोरेड्डीवार यांचा सत्कार
कूरखेडा-
राज्य स्तरावर नावाजलेल्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची यशस्वीपणे धूरा सांभाळणारे प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांची नूकतीच राज्याचा सहकार क्षेत्रातील वाटचालीचा केंद्र बिंदु असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक मुंबई चा संचालक पदावर निवड झाली आहे सदर बाब जिल्हा वासीया करीता भूषणावह आहे त्यांचा या उपलब्धतेची दखल घेत आरमोरी येथे कूरखेडा शहर विचार मंचाचा वतीने त्याना शाल श्रीफल व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला
सहकार महर्षि अरविन्द सावकार पोरेड्डीवार व जिल्हा नागरी बैंकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा मार्गदर्शनात त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळणारे प्रंचित पोरेड्डीवार यांचा नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेची वाटचाल यशस्वीपणे सूरू आहे जिल्हा बैंकेतील व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करीत तसेच पारदर्शक व्यवहारामूळे देश व राज्य पातळीवर बैकेचा नावलौकीक त्यांचा नेतृत्वात झालेला आहे नूकतीच त्यांची निवड राज्यात अग्रगण्य असलेल्या राज्य सहकारी बैंकेचा संचालक पदावर झाल्याने त्यांचा या यशस्वी वाटचालीची दखल घेत त्यांचा सत्कार कूरखेडा शहर विचार मंचाचा वतीने करण्यात आला याप्रसंगी शहर विचार मंचाचे संयोजक अध्यक्ष माधवदासजी निरंकारी, उपाध्यक्ष आशाताई तूलावी, सचिव उल्हास महाजन, कोषाध्यक्ष रविंद्र गोटेफोडे ,प्रवक्ता ॲड.उमेश वालदे ,सदस्य बबलू हूसैनी, गणपत सोनकूसरे,केशव गूरनूले, डॉ जगदीश बोरकर, राजेश उईके, जावेद शेख,प्रा विनोद नागपूरकर, सिराज पठान,संध्याताई नैताम,योगीता मडावी उपस्थित होते.
?????????????????