चंद्रपूर, दि. 21 : शासन निर्णयान्वये, खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीकरीता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. धान खरेदी करीता उर्वरीत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदीचा अंदाज बघता शासन निर्णयानुसार दि 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून धान खरेदीकरीता दि.28 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.
दि.१७ जुलै २०२४
*गडचिरोली:- SURJAGAD ISPAT PVT.LTD.आज दि.१७ जुलै २०२४
*सुरजागड इस्पात प्रा.लि.च्या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मान.देवेंद्र जी फडणवीस सोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,...
गडचिरोली:##आम आदमी पार्टी देसाईगंजच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री आप पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आमदार कृष्णा गजभिये यांच्या कार्यालय समोर...