Tuesday, January 14, 2025
Homeचंद्रपूरभजन शिकविणाऱ्या शाळेत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची गंभीर दखल

भजन शिकविणाऱ्या शाळेत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची गंभीर दखल

# brhmpri चंद्रपूर : ब्रह्मपुरी (Bramhapuri) तालुक्यातील कोसंबी (Kosambi) येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीवरून (Absence) संताप (Anger) व्यक्त करून बंड पुकारत मोर्चा काढला. याची गंभीर दखल घेत राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज जि. प. प्राथमिक शाळा कोसंबी (खड) येथे अकस्मात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत शिक्षकांना चांगलेच धारेवर धरत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता दर्जा तपासात कानपिचक्या दिल्या.ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथे १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण देणारी जि. प. शाळा असुन येथे ५ शिक्षक कार्यरत आहे. मात्र येथील कार्यरत शिक्षक हे मुख्यालयी राहात नसून ब्रम्हपुरी वरून ये-जा करतात. यामुळे शिक्षक वृंद वेळेवर शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असून अनेक विषयाच्या तासिका होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सदोष कार्यप्रणालीवर ठपका ठेवत गावातून प्रभात फेरी काढत आगळे -वेगळे आंदोलन केले. सदर आंदोलनाची गंभीर दखल राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसंबी (खड) येथे ब्रम्हपुरी गटविकास अधिकारी पुरी यांना सोबत घेऊन अकस्मात भेट दिली. यानंतर आ. वडेट्टीवार यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विचारपूस करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत गुणवत्ता दर्जा ही तपासला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडत शिक्षकांच्या लेट लतीफ कारभाराचा आढावा आमदार महोदयांसमोर निडरपणे मांडला.विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होताच माजी मंत्री वडेट्टीवार यांनी ग्राम सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या समक्ष शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. तर मुख्यालयी न राहता कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता अदा न करण्याचे आदेश देत पुढील महिनाभरात शैक्षणिक गुणवत्ता दर्ज्यात वाढ व विद्यार्थ्यांची प्रगती बाबत गांभीर्याने न घेतल्यास शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करून कठोर कारवाई करणार असल्याची तंबी देखिल दिली. आज क्षेत्र आमदार वडेट्टीवार यांच्या भेटीने शिक्षकांची तारांबळ उडाली. तर थेट विद्यार्थ्यांप्रती आ. वडेट्टीवार यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबाबत गावकरी आणि विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माजी मंत्री विजय वडेट्टीवार

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments