आजही अनेक ठिकाणी महिला या छोटया छोटया गोष्टींसाठी घरातील पुरूषांवर अवलंबून असतात. जर सर्व महिला आत्मनिर्भर झाल्या तर त्यांच्या व्यक्तीगत विकासाबरोबरच देशाचा विकासही निश्चीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भाजपा जिल्हा आत्मनिर्भर भारत आघाडीतर्फे आयोजित महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित चर्चा सत्रात बोलताना ना. मुनगंटीवार यांनी सांगीतले.
आपण जर व्यवस्थीत प्रशिक्षण घेतले तर उदयाच्या यशस्वी उद्योजिका होणार यात शंका नाही असे प्रतिपादन सुध्दा ना. मुनगंटीवार यांनी केले. आपला देश कुठल्याही गोष्टीत किंवा तंत्रज्ञानात कधिही मागे नव्हता, परंतु विदेशी लोकांनी आपले तंत्रज्ञान चोरून नेल्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी त्रास होतो, परंतु आपण सर्वांनी मिळून देशासाठी एकत्र विचार केला तर निश्चीत आपण व देश एकाच वेळेला पुढे जावू. जुन्या काळात प्रत्येक गावात १२ बालुतेदार ही संकल्पना होती. ज्यामुळे सगळयांना काम मिळायचे. परंतु इंग्रजांनी ही पध्दत मोडीत काढली. पुन्हा अशा प्रकारचे छोटे उद्योग हे गावागावात उभे झाले पाहीजे. ज्यामुळे प्रत्येक गावाचा विकास होण्यास मदत होईल. यासर्व कला पित्याकडून मुलाकडे यायचा व पुढे पिढीजात त्या पुढे जायच्या. तसेच शिक्षण आता महिलांनी सुध्दा घ्यावे असे प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी केले.