चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड येथे श्री साईबाबांचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिर्डी के साईबाबा’ या महानाट्य प्रयोग आयोजित करण्यात आले होते.

नागरिकांसाठी आयोजित केल्याने साईबाबांचे जिवंत जीवनचरित्र बघण्याची संधी स्थानिक नागरिकांना उपलब्ध झाली.

या महानाट्याच्या प्रयोगाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजय भाऊ वडेट्टीवार तर महा नाट्य प्रयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी, सौ किरणताई विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा पार पडले.

यावेळी प्रदेश महासचिव डॉ नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड राम मेश्राम, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार आदी मान्यवर तसेच शिर्डी के साई बाबा महा-नाटकातून साईबाबांचे जिवंत जीवनचरित्र बघून दर्शन घेण्यासाठी खुप मोठ्या संख्येने दर्शक व प्रेक्षक उपस्थित होते.