उपवनसंरक्षक कार्यालयासमोर मजूरांचे उपोषण
आत्ता तुम्हीच सांगा १८ महिन्यांपासून आम्ही जगायचे कसे?
उपवनसंरक्षक कार्यालयासमोर मजूरांचे उपोषण
विदर्भ कि दहाड प्रतिनिधी
देसाईगंज : वडसा, आरमोरी, पोर्ला या तिन्ही वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या असताना स्वतःचा जीव वनविभागाची विविध कामे करणाऱ्या वनमजुरांना १७ महिन्यांपासून हक्काची मजुरीच मिळालेली नाही. परिणामी त्यांनी आता येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
धोक्यात घालून त्या ठिकाणी
वास्तव्यास राहणाऱ्या आणि वडसा वनविभागाच्या हद्दीत
आतापर्यंत वाघांनी २३ पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले, मोठ-मोठे साहित्य खरेदी केले, वाहन इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली, परंतु वाघ संरक्षणाचा एक भाग असणाऱ्या मजुरांना त्यांची मजुरी ऑगस्ट २०२१ पासून आतापर्यंत दिली नाही.
दीड वर्षापासून मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
हे वनमजूर दिवस-रात्र वनअधिकाऱ्यांसोबत गस्तीला जात होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अधिकाऱ्यांसोबत जंगल परिसरात त्यांनी गस्त घातली. पण कोणालाच आमची दया आली नाही, अशी खंत हे मजूर व्यक्त करतात. अधिकाऱ्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे या मजुरांनी २९ डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली.
