वैयक्तिक ओळख व विकासासोबतच देश हितासाठी बौध्दिक संपदा हक्का संदर्भातील ज्ञान सर्वत्र पोहचावे
-डॉ. भारत एन सूर्यवंशी
✍️देसाईगंज: शासनाद्वारे बौध्दिक संपदा हक्का संदर्भातील ज्ञान जनजागृतीचे कार्य अनेक वर्षांपासून सातत्याने चालविले जात आहेत. मात्र काही अपवादात्मक उदाहरणे सोडली तर या संदर्भात ग्रामीण भाग अनभिज्ञ आहे. बौद्धिक संपदा ही मानवी बुद्धी व मनाची निर्मिती प्रक्रिया असून बौद्धिक संपदा हक्क हे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञाना पर्यंतच मर्यादित नसून ते साहित्य व समाजविज्ञान शाखेतील अनेक विषयांतील संशोधनास लागू पडते. बौद्धिक संपदा हक्क प्राप्त व्यक्तींसाठी शासनाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या संशोधनाचे बौद्धिक संपदा हक्क प्राप्त केल्याने व्यक्तीची ओळख निर्माण होते, विकास होतो व सोबतच देशाची ओळख जागतीक पातळीवर पोहचते. म्हणुनच बौध्दिक संपदा हक्का संदर्भातील ज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी सर्वाथाने प्रयत्न होणे हि आजच्या विज्ञानयुगाची गरज आहे’ असे विचार शासनाच्या नागपूर स्थित राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्क नियोजन विभागाचे सहाय्यक नियंत्रक डॉ भारत एन सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. नूतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे राजीव गांधी बौद्धिक संपदा हक्क नियोजन कार्यालय नागपूर व महाविद्यालयातील कार्यशाळा /चर्चासत्र /अधिवेशन आयोजन विभाग व महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्देमाने आयोजित “बौध्दिक संपदा हक्क “या विषयावर आभासी पद्धतीने नुकत्याच आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ सूर्यवंशी यांनी बौध्दिक संपदेचे प्रकार सोदाहरण स्पष्ट केले. पुढे त्यांनी बौद्धिक संपदेचे मूल्य, बौद्धिक संपदा हक्क, या कायद्याचे उद्देश, बौध्दिक संपदा मालकी हक्काचे प्रकार, बौध्दिक संपदेची नोंदणी,भारतातील बौध्दिक संपदा हक्क नोंदणी कार्यालये इत्यादी संदर्भातील विस्तृत माहिती अगदी सोप्या भाषेत मांडली. कार्यक्रमाचे उदघाटक तथा अध्यक्ष स्थानावरून बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी बौध्दिक संपदा हक्क संकल्पना व त्याचे फायदे ग्रामीण भागातील संशोधकांनी समजून घ्यावी, इतरांनाही त्यासंदर्भात अवगत करावे, व आपल्यातील संशोधन नाविन्यता जगापुढे आणावी असे आवाहन केले.
कार्यशाळा आयोजन समिती समन्वयक प्रा.डॉ हितेंद्र धोटे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. प्रा. वैशाली बोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रभारी प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांनी आभार मानलेत. कार्यशाळेला भारतातील विविध विद्यापीठांतील प्राद्यापक, संशोधक व विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता आयोजन समिती सदस्य प्रा डॉ जे पी देशमुख, प्रा निहार बोदेले, प्रा राजू चावके, प्रा तडसे यांनी मोलाचे सहकार्य केले.