देसाईगंज: “महात्मा गांधी यांनी सत्य-अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले व जगाला अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्विकारला. अलीकडे तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झालेली असताना जागतिक शांततेसाठी बापूंचे विचारच प्रेरणादायी ठरतील. असे प्रतिपादन डॉ. डॉ शंकर कुकरेजा यांनी केले. ते स्थानिक आदर्श महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी मानवंदना कार्यक्रमात बोलत होते. सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतांजली वाहून अभिवादन करण्यात आले. “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नायक महात्मा गांधी यांचे ३० जानेवारी १९४८ रोजी दु:खद निधन झाले. हा दिवस आजही लोकांच्या स्मरणात असून हा दिवस दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो” असे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयदेव देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डॉ. हितेंद्र धोटे यांनी तर व उपस्थितांचे आभार प्रा. निलेश हलामी यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...