डॉ. जयदेव देशमुख
देसाईगंज: “महाविद्यालय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांच्या क्षमतेनुसार योग्य रोजगार प्राप्त व्हावा याकरिता कटिबद्ध आहे. म्हणूनच महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, परीक्षांची तयारी व रोजगार मिळावे आयोजित करून नियमित शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्याचे प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांनी या सर्व संधींचा लाभ घ्यावा व शिक्षणा बरोबरच आपले कौशल्य वृद्धिंगत करून स्वतःला अधिक रोजगारक्षम बनवावे.” असे मार्गदर्शन डॉ जयदेव देशमुख यांनी केले. ते स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातील रोजगार विभागाच्या वतीने पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी व पदवत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रम प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात व रोजगार विभागाचे प्रमुख प्रा. निहार बोदेले यांच्या नेतृत्वात या मेळावाचे आयोजन करण्यात आले. “खाजगी क्षेत्रातील रोजगार याच्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यात मदत करते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.” असे श्री प्रवीण सर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रातील असणाऱ्या रोजगाराच्या क्षमते बाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यामध्ये इंडिया प्लेसमेंट सर्विसेस संस्थेच्या वतीने आयसीआयसीआय बँक, टाइम्स स्प्रो, लॉजिस्टिक, टाटा एआयए, यासारख्या कंपन्यांच्या विभिन्न पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या व काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार विभाग प्रमुख प्रा. निहार बोदेले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. योगेश तूपट यांनी मांनले.
