आरमोरी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका ,आरमोरी तर्फे पक्ष वाढीच्या कार्यासाठी दि. २ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गडचिरोली सारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील युवकांना मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचे सामाजिक, राजनीतिक शैक्षणिक कृषी औद्योगिक अशा विविध विषयावरील विचारांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत जी बनकर यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शनातून प्रेरित होऊन आरमोरी शहरातील युवकांनी मनसे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष मा. रंजीत भाऊ बनकर , मनसे तालुकाध्यक्ष मा. राकेशभाऊ सोनकुसरे, मनसे तालुका अध्यक्षा मा.विभाताई बोबाटे यांच्या नेतृत्वात आरमोरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मा.तेजराव चिलबुले यांनी आपल्या मित्र परिवारासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केले तेजराव चिलबुले यांचे कार्य बघता त्यांना मनसे शहर संघटक पदाची जिम्मेदारी देण्यात आली तर मनसे शहर अध्यक्ष पदाची जीमेदारी खंबीर युवा नेतृत्व असलेले लिलेश सहारे यांना देण्यात आले. पक्षातर्फे देण्यात आलेल्या जिम्मेदारीपेक्षा जास्त जोमाने काम करून पक्षाचे संघटन आधुनिक पद्धतीने बळकट करण्याचे कार्य तीव्र गतीने करणार असे वचन तेजराव चिलबुले व लिलेश सहारे यांनी दिले आपल्या निवडीचे श्रेय मित्र परिवार व मनसे सैनिकांना दिले याप्रसंगी मनसे तालुका प्रसिद्धी प्रमुख आशुतोष गिरडकर, मनसे सैनिक अतुलजी मने, अशोकजी सपाटे व अन्य उपस्थित होते.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...