देसाईगंज:माननीय अरविंद केजरीवाल यांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत देसाईगंज तालुक्यातील तुळशी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य सहीत असंख्य महिला देसाईगंज आप च्या कार्यालय मध्ये येऊन पक्ष प्रवेश केला।देसाईगंज आम आदमी कार्यालय येथे 21 डिसेंबर ला आयोजित कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांच्या हस्ते अनेक महिलांनी आम आदमी पक्ष प्रवेश करून इन्कलाब जिंदाबाद चा नारा देत नवीन राजकीय क्रांतीची सुरवात केली।देसाईगंज तालुक्यातील तुळशी गावातील अनेक समस्या मार्गी लावण्यात व सामान्य नागरिकांना न्याय देण्यात सध्याचे स्थानिक राजकिय पुढारी अन्याय करत असून लोकांचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यात सर्व राजकीय पक्ष अपयशी असून दिल्ली व पंजाब राज्यात ज्या प्रकारे कमालीची सफलता पक्षाला मीराली आता संपूर्ण देशात राजकीय क्रांती करिता आम आदमी पक्ष हा एकच पर्याय जनते समोर असुन सर्वांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून पक्ष मजबूत करण्यास सहकार्य करावे असे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमास विद्या कांबळे,ज्योतसना ठाकरे,काजल मारबते, ज्योती सुर्यवंशी, किरण मारबते, महानंदा मारबते,सुमित्रा मारबते, भाविका मारबते,लक्ष्मीबाई भुते, आशा राहुत, सरस्वती ठाकरे,वंदना घोडमोडे,गायत्री ठाकरे,पुष्पा पत्रे, प्रमिला ठाकरे,सत्यभामा नाकाडे,तेजु सारवे,गॉसिया पठाण, शिल्पा बोरकर, आंचल खोब्रागडे,आशिष घुटके, तबरेज खान,नवेद खान, पठाण,दीपक नागदेवे,भरत दयलानी,आशिष कोवे, प्रमोद दहिवले, दहिकर, व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.
??????????????


